दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या चोरास रंगेहात पकडले

दत्ता म्हसकर
शनिवार, 17 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी रात्री जुन्नर शहराच्या मध्यवस्तीतील क्रांती गणेश मंदिरात घडला.

वसंत मल्हारी भोजणे (रा. गोद्रे ता.जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. या मंदिरातील चोरीची ही दुसरी वेळ आहे. रात्र झाल्याने मंदिरात झोपलेल्या आरोपीने लोखंडी हुकचा वापर करून दानपेटी फोडली यावेळी आवाज झाल्याने परीसरात गप्पा मारत असलेले कार्यकर्ते सुनील सोनपाटकी, शैलेश काजळे, बाळासाहेब गाजरे, निरंजन भगत, प्रकाश प्रजापती व अन्य पाच ते सहा जणांनी दरवाजा उघडून पाहिले असता त्यांना दानपेटी फोडल्याचे लक्षात आले दानपेटीतील सुमारे पाचशे रुपयांची रक्कम त्याच्याकडे मिळून आली पाचशेची एक जुनी नोट ही मिळाली. त्यास मुद्देमाला सह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत. 

Web Title: Marathi news junnar news thief temple arrest

टॅग्स