सहजयोग ध्यान शिबीरास दोन हजार साधकांची उपस्थिती

दत्ता म्हसकर
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

जुन्नर : जुन्नर येथे आयोजित केलेल्या सहजयोग ध्यान शिबिरास दोन हजार साधकांची उपस्थिती लाभली. येथील खत्री हायस्कूल मैदानावर रविवार (ता. 4) सायंकाळी 6 वाजता सहजयोग ध्यानधारणा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सहजयोग परिवाराच्या वतीने जुन्नर शहरातून दुपारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
सहजयोग परिवाराच्या संस्थापिका प.पू.माताजी श्री निर्मलादेवी प्रणित कुंडलिनी जागृती व ध्यानधारणा शिबिरातून माणसाच्या जीवनातील स्थिरता, विद्यार्थ्यांमध्ये होणारी एकाग्रता वाढ, शेती मधील उत्पादनात होणारी वाढ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील होणाऱ्या अमुलाग्र बदल आदी विषयांवर व्याख्याते प्रा. अशोकराव चव्हाण यांनी सोदाहरण माहिती दिली.

प्रास्ताविक राजेश मनोजा यांनी केले यावेळी नगराध्यक्ष श्याम पांडे नगरसेवक समीर भगत, भाऊ कुंभार, तसेच संतोष नवले, चेतन शहा, उज्वला  शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. 

Web Title: Marathi news junnar news yog shibir