कल्याण - हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू

रविंद्र खरात
सोमवार, 12 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट घातले पाहिजे अन्यथा कारवाई करू असा इशारा कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक पोलिसांनी दिला होता, आज (ता 12) पासून कल्याण डोंबिवली शहरात हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू झाली, मात्र ही कारवाई तुरळक प्रमाणात असून वाहतूक पोलीस अनेक ठिकाणी बंदोबस्तात असून ते पुन्हा येताच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिली. 

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट घातले पाहिजे अन्यथा कारवाई करू असा इशारा कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक पोलिसांनी दिला होता, आज (ता 12) पासून कल्याण डोंबिवली शहरात हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू झाली, मात्र ही कारवाई तुरळक प्रमाणात असून वाहतूक पोलीस अनेक ठिकाणी बंदोबस्तात असून ते पुन्हा येताच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिली. 

कल्याण डोंबिवली सहित ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात दुचाकी वाहन चालकांचे अपघात संख्या वाढत असताना त्यात जखमी आणि मृत्यूची संख्या वाढत असल्याने , वाहतूक पोलिसांनी डोके नसलेला माणूस हा प्रबोधनात्मक कार्यक्रम ही राबविण्यात आला, मात्र त्याला ही दुचाकी वाहन चालकांनी काही प्रतिसाद दिला नाही. याची दखल घेत हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आणि 12 मार्च पासून कारवाई करू, सुमारे पाचशे रुपयांचा दंड भरावा लागेल असा इशारा वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिला होता. 

मनुष्यबळ कमी असल्याने तुरळक कारवाई 
शेतकरी मोर्चा, वाहतूक कोंडी, मंत्री दौरा बंदोबस्त, पोलीस भर्ती प्रक्रियेमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी वर्गाची नेमणूक केली असल्याने कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांची संख्या ही कमी होती. यामुळे आजपासून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होते का याकडे लक्ष लागले होते. दरम्यान कल्याण पश्चिम आणि डोंबिवली काही भागात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करण्यात आली असून मनुष्यबळ मिळताच या कारवाईला वेग येईल अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 

ही कारवाई आमच्यासाठी नव्हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी
अपघात झाल्यावर दुचाकी स्वार जखमी होतो त्यासोबत अनेक वेळा हेल्मेट न घातल्याने त्याचा जीव जातो यामुळे त्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी ह्या कारवाईचा बडगा आहे असे स्पष्ट मत सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी व्यक्त केले. 

सिंगनल यंत्रणा, स्पीड ब्रेकर, रस्ते दुरुस्ती, ही कामे वाहतूक पोलिसांची नसुन त्याबाबत पालिकेशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. पालिका हद्दीतील रस्ता असो वा महामार्ग रस्ता असो असा वेगळा हेल्मेट बाबत वेगळा काही आदेश नाही त्यामुळे ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले. 

दुचाकी वाहन चालकाच्या सोबत असलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले तर त्या दोघांचे फायद्याचे असून पहिल्या टप्यात वाहन चालकाला सक्ती करणार असून नंतर पुढील कारवाई करणार असल्याचे संकेत सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिले असून याला विरोध करण्यापेक्षा याचा मागचा हेतू लक्षात घेऊन नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

कल्याण पश्चिम सुभाष चौकात आज (ता. 12) सकाळी 11 च्या सुमारास कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव आणि त्यांच्या पथकाने हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकाविरोधात कारवाई केली , यावेळी काही वाहन चालकांनी विरोध केला मात्र त्याला न जुमानता ही कारवाई सुरू होती. 

Web Title: Marathi news kalyan news action on without helmet driver