बिबट जनजागृती कार्यशाळा 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

जुन्नर - बिबट्याने ऊस तोडणी महिला कामगारावर हल्ला केलेल्या हिवरे खुर्द ता. जुन्नर येथे गुरुवारी (ता. 1) बिबट मानव सहजीवन-जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख, सहायक महेंद्र ढोरे, वनपाल मनीषा काळे. वनरक्षक कांचन ढोमसे, प्राचार्य एम. जी. भोर, शिक्षक, विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते. यावेळी बिबट जीवशास्त्र, बिबट वावर, बिबट्याचा स्वभाव तसेच स्वसंरक्षणार्थ घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. देशमुख यांनी माहिती दिली. बिबटयापासून बचाव कसा करावा, याची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले. 

संबंधित बातम्या - 

Web Title: marathi news leopard awareness program