परिस्थिती शांततापूर्ण, अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलिस आयुक्त शुक्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

शहरात कोठेही दगडफेक, हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. पीएमपीएमएलच्या तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. शहरात लहान-मोठे मोर्चे निघत आहेत. त्याद्वारे निवेदन देण्यात येत आहेत. सध्या पुण्यातील सर्व भागात वाहतूक सुरळीत आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.

(रश्मी शुक्ला, पुणे पोलिस आयुक्त )

पुणे : ''पुणे शहरातील परिस्थिती शांततापूर्ण आहे. सध्या पीएमपीएमएल, रिक्षांची वाहतूक सुरु आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये'', असे आवाहन पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. 

कोरेगाव भिमा येथील झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पुण्यातही खबरदारी म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत शुक्ला यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

शुक्ला म्हणाल्या, शहरात कोठेही दगडफेक, हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. पीएमपीएमएलच्या तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. शहरात लहान-मोठे मोर्चे निघत आहेत. त्याद्वारे निवेदन देण्यात येत आहेत. सध्या पुण्यातील सर्व भागात वाहतूक सुरळीत आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही शुक्ला यांनी सांगितले.  

Web Title: marathi news local news koregaon bhima riots situation is stable do not believe in rumors says Pune commissioner of police Rashmi Shukla