'मॉर्डन कॅफे'च्या भटारखान्याला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

पुण्यातील शिवाजीनगर भागातील "हॉटेल मॉर्डन कॅफे'च्या भटारखान्यातील चिमणीने पेट घेतला. अग्निशामक दलाची सतर्कता आणि ग्राहक, कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉटेलबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

पुणे : मुंबई येथील कमला मिलच्या परिसरातील हॉटेल जळून 14 जण ठार झाल्याची घटना ताजी असताना रविवारी दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर भागातील "हॉटेल मॉर्डन कॅफे'च्या भटारखान्यातील चिमणीने पेट घेतला. अग्निशामक दलाची सतर्कता आणि ग्राहक, कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉटेलबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

या संदर्भात माहिती कळताच कमला मिलच्या आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाकडून कसबा अग्निशामक केंद्रातील बंब आणि पाण्याचा टॅंकर तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. भटारखान्यातील चिमणीने पेट घेतल्याचे अग्निशामक दलालाच्या जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रथम भटारखान्यातील पाच ते सहा सिलिंडर तातडीने बाहेर काढून पाण्याचा मारा करीत ही आग अवघ्या दहा मिनिटांत आटोक्‍यात आणली. यामुळे वित्त व जीवितहानी झाली नाही.

अग्निशामक केंद्राचे अधिकारी रवींद्र आढाव, चालक गोरख गव्हाणे, प्रकाश जाधव, अनिल करडे, हरीश बुंदेले, समीर दळवी, नीलेश कर्णे, योगेश पिसाळ, अतुल खोपडे यांनी ही कामगिरी पार पाडली. 
 

Web Title: marathi news local news pune news modern cafe fire