पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये संरक्षणात्मक कामे होणार : वळसे-पाटील 

dilip patil
dilip patil

मंचर : माळीण (ता. आंबेगाव) येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूस्खलन व दरड कोसळण्याचा धोका आहे. संभाव्य दरडग्रस्त २३ गावांमध्ये संरक्षणात्मक कामे करण्यासाठी तीन कोटी ६५ लाख २३ हजार रुपये निधी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे दिला आहे, असे लेखी उत्तर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २२)  नागपूर विधिमंडळात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या तारांकित प्रश्नाला दिले आहे.  

संभाव्य आपत्ती येण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी करण्याबाबत वळसे पाटील यांनी प्रशासनास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी २३ गावांमध्ये भूस्खलन व दरड कोसळण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असल्याचा अहवाल ऑक्टोबर २०१७ मध्ये शासनाला सादर केला होता. त्यानुसार राज्यशासनाने कार्यवाही केली आहे. आंबेगाव तालुक्यात पासारवाडी, काळवाडी क्रमांक एक, काळवाडी क्रमांक दोन, बेंडारवाडी (पोखरी), भगतवाडी आदी धोका असलेल्या गावांना संरक्षणात्मक कामे करण्यासाठी निधी प्राप्त होणार आहे.  

माळीणसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये व खबरदारीचे उपाय त्वरित करता यावेत. यासाठी आंबेगाव येथे कायमस्वरूपी आपत्ती निवारण कक्षाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणीही वळसे पाटील यांनी केली होती. या मागणीनुसार आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील तहसीलदार कार्यालयात १ जून ते ३० सप्टेबर या कालावधीत आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com