बऱ्हाणपूरला ओढा खोलीकरण पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

उंडवडी : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड व एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे सव्वा किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामाची पाहणी मंडल अधिकारी एम. पी. सय्यद व सरपंच वनिता दिलीप गवळी यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी केली. 

उंडवडी : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड व एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे सव्वा किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामाची पाहणी मंडल अधिकारी एम. पी. सय्यद व सरपंच वनिता दिलीप गवळी यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी केली. 

या वेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष विलास चांदगुडे, पोलिस पाटील बाळासाहेब गवळी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गवळी, अंकुश चांदगुडे, महेश चांदगुडे, किसन चांदगुडे, विनायक काळे, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते. बऱ्हाणपूर या गावाला वरदान ठरत असलेला सोनवडी-उंडवडी ते बऱ्हाणपूर हा ओढा वर्षानुवर्षे गाळ साचल्याने भुजला होता. ओढ्याचे खोलीकरण करण्यात यावे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होती.

सरपंच वनिता दिलीप गवळी व उपसरपंच योगेश जाधव यांनी एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे पोकलेन मशिन व सकाळ रिलीफ फंडाकडे डिझेलसाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार फोरमकडून ओढा खोलीकरणासाठी पोकलेन मशिन उपलब्ध करून देण्यात आले होते व सकाळ रिलीफ फंडाकडून डिझेलसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाला गावाचा हातभार म्हणून गावकऱ्यांनीही एक लाख रुपये डिझेलसाठी लोकवर्गणी जमा केली.

येथे दीड ते पावणेदोन महिन्यात 1 हजार दोनशे 11 मीटर लांबी व सरासरी 35 मीटर रुंदी व सरासरी दोन मीटर खोली असे खोलीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ओढ्याच्या दोन्हीही बाजूने भरावावर रस्ता तयार करण्यात आला आहे. ओढ्यात पावसाचे पाणी जागोजागी आडावे; अथवा ओढा शेतकऱ्यांना ओलांडून जाता यावे, यासाठी आडवे माती बांध ठेवण्यात आले आहेत. 

याबाबत येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विलास चांदगुडे म्हणाले, ''या ओढ्यावर तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याची सोय झाली आहे. तसेच ओढ्याचे खोलीकरण झाल्याने ओढा आमच्या गावाला आणि शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. या ओढ्यावर सरकारने सिमेंट बंधारे बांधल्यास आमचा कायमचा दुष्काळ हटेल.''

Web Title: marathi news marathi website Pune News Baramati News Sakal Relief Fud