सिंहगड घाट रस्त्यासाठी मिळणार दीड कोटी रुपये

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 27 जुलै 2017

खडकवासला : सिंहगड घाट रस्त्यासाठी 5कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे काम लवकर सुरू होणार आहे. 

या घाटात दरडी पडत असल्याने गडावर येणाऱ्या पर्यटनकासाठी धोकादायक असल्याने डोंगरावर एक्सप्रेस हायवे प्रमाणे डोंगरात जाळ्या बसविणार असून त्यासाठी 1.61 कोटी रुपयांचा निधी वन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

हे काम 2018 अखेर पूर्ण करणार असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. यासंदर्भात आमदार भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नात माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, विजय काळे, माजी वन मंत्री पतंगराव कदम यांनी सहभाग घेतला.

Web Title: marathi news marathi website pune news sinhagad fort