ज्येष्ठ नागरीकांनी साजरी केली माडग पार्टी

ज्येष्ठ नागरीकांनी साजरी केली माडग पार्टी

वडगाव निंबाळकर : ३१ डिसेंबरची रात्र म्हणजे मौज मस्तीत रात्र धुंदीत घालवायची, मध्यरात्रीनंतर एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या अशी प्रथाच सर्वसाधारणत: रूढ होत चालली आहे. त्यागी भावना नष्ट होउन भोगी भावना जेपासली जाऊ लागली आहे.

यावरील उपययोजनेचा भाग म्हणून कठिण परिस्थीतीत आपण काढलेल्या दिवसांची आठवण तरूण पिढीला व्हावी यासाठी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील ज्येष्ठ नागरिकांनी या वर्षा आखेरच्या सूर्यास्ताला माडग पार्टीचे आयोजन करत एक वेगळा आदर्श तरूणाईपुढे ठेवला आहे.

हुलग्यापासून बनवलेल माडग पूर्वी आवडीनं खाल्लं जात होतं. दुष्काळी परिस्थितीत फक्त माडग खाउन दिवस काढल्याच्या आठवणी ज्येष्ठांच्या गप्पांतून जाग्या झाल्या आणि आपण रविवार ता. ३१ सरत्या वर्षाच्या सूर्यास्ताला गावातील ज्येष्ठांना आमंत्रित करून त्यागाचा संदेश देण्यासाठी व लोप पावत चालत असलेल माडग तरूणाईला माहीत व्हावं, यासाठी माडग पार्टीचं आयोजन करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विजय हिरवे, यशवंत साळवे यांनी मांडली. याला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरीक पंडितराव दरेकर, कोंडीबा पवार, अजिज मनेर, छबुराव साळवे, झुंबर बारवकर, विलास साळुंके, पवन जाधव, राजकुमार शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ सहभागी झाले.

अनेक तरूण मंडळांकडून नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते. खाओ पीओ ऐश करो अशा पद्धतीची जीवनशैली प्रतिष्ठेची बनू लागली आहे. त्यागाची भावनाच नाहीशी झाली आहे. ज्येष्ठांनी माडग पार्टीच्या माध्यमातून तरूणाईपुढे त्यागी भावनेचं दर्शन घडवलं. ज्येष्ठांनी एकत्र येउन सरत्या वर्षाला निरोप देताना जमलेल्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधत आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही चांगले अनुभव इतरांना शेअर केले.

ज्येष्ठांच्या अनोख्या पार्टीला तरूणांनीही कुतुहलापोटी हजेरी लावली होती. वेगळ्या संकल्पनेतून दिलेला संदेश तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. माजी सरपंच जीवन बनकर, सामाजिक कार्यकर्ते मोहन हिरवे यांनी स्वागत केले. महादेव फुले यांनी प्रास्तविक केले. पार्टीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ज्येष्ठांनी संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान दोन महिन्यांनंतर एकत्र येण्याचा निर्धार यावेळी केला. 

माडग म्हणजे काय
भाजलेला हुलगा रव्यासारखा बारीक करून त्यात गुळ, आल, चवीप्रमाणे तिखट मिठ, तुप अशा प्रकारच्या रेसपीतून बनवलेल माडग आयुर्वेदीक असल्याचा जेष्ठांचा दावा आहे. आत्ताच्या भाषेत आपण हुलग्याचे सुप म्हणूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com