किल्ले बनविण्यासाठी चिमुकल्या शिलेदारांची लगबग

गणेश बोरुडे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

तळेगाव स्टेशन : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. दिवाळीच्या सुट्ट्या लागताच आपल्या घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चिमुकल्या शिलेदारांची लगबग सुरु झाली आहे.दिवाळीच्या खरेदीत चित्रे आणि किल्ला बनवण्याचे इतर साहीत्य देखील महत्त्वाचा घटक बनलेला दिसतोय.

दिवाळी हा हिंदू धर्म संस्कृतीतला सर्वांत मोठा सण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौऱ्याची आणि त्यागाची दिवाळीतही आम्हाला आठवण राहावी, या उद्देशाने घरासमोर किल्लायांची प्रतिकृती बनवण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.

गावागावातील चाळी,वाडे आणि हवेल्या सिमेंटच्या जंगलात बदलून माणुसकी कुंपणात बंदिस्त झाली असली तरी,बालगोपाळांकडून घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चालू असलेल्या लगबगीने दिवाळीची चाहूल लागते. आधुनिकतेच्या जमान्यातही किल्ला बनविण्याची क्रेझ नव्या पिढीत वाढत असल्याने मावळे, प्राणी, पक्षी शिवाजी महाराजांचे सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवरायांच्या मूर्ती अर्थात चित्रांच्या खरेदीसाठी कुंभारवाडयापासून बाजारपेठेपर्यंत चिमुकल्या शिलेदारांची लगबग सुरु झाली आहे.

मुलांना दिवाळीची सुट्टी लागली की सणाच्या मुख्य खरेदीपेक्षाही किल्ला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव आणि खरेदी करताना थोरामोठ्यांतही बालपण जागे होताना दिसते. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्यानंतर तळेगाव दाभाडे सारख्या निमशहरी भागात लहान मुलांना खेळणे आणि खाण्यापिण्यापेक्षा किल्ले तयार करण्याची भारीच हौस दिसून येते आहे. साधारणतः दसऱ्यानंतर लाल माती गोळा करुन विटा दगडांचे डोंगर साकारले जातात.

हिरवळीसाठी डोंगरावर हाळीव उगवून दिवाळी जवळ येताच डोंगरावर चिखलाचे पायऱ्या बुरुज आणि प्रवेशद्वार बांधून किल्ला साकारण्यात चिमुकले शिलेदार सध्या दंग झालेले दिसत आहेत. डोंगर,किल्ला बांधून आल्यावर काऊ-चुना आणि रांगरंगोटीद्वारे त्याला मूर्त स्वरूप दिले जाते. शेवटी भगवा ध्वज आणि सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बालेकिल्ल्यावर विराजमान करुन प्रवेशद्वारापासून भालदार चोपदार,सनई चौघडेवाले,घोडेस्वार,सेनापती,मावळे दिमतीला हजर. अगदी तनमन धन लावून एकचित्ताने बनविलेला किल्ला सर्वांना दाखविण्यासाठी तयार. किल्ले बनवण्याची परंपरा कायम राहावी आणि बच्चेमंडळींना प्रोत्साहन देण्याहेतूने विविध संस्थांकडून दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. दिवाळीचे किल्ले बनवताना वापरलेल्या संकल्पना पाहून साहजिकच बालगोपाळांमधील धर्माभिमानी, अभ्यासू, चौकस,नाविन्यपूर्ण कलाकारी वृत्तीचे दर्शन होते. एकंदरीतच दिवाळीच्या धामधुमीच्या सर्वांच्या पसंतीस पडेल अशी किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात चिमुकल्यांतले आधुनिक हिरोजी इंदुलकर सध्या घरोघरी दृष्टीस पडत आहेत.

Web Title: marathi news marathi websites Diwali 2017 Pune News