मुसळधारेने निमगाव केतकीत हाहाकार! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

निमगाव केतकी : शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सुमारे पाऊण तास झालेल्या अतिवृष्टीमुळे निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे हाहाकार उडाला. बैलपोळ्याच्या आठवडे बाजारात किमान दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या 15 वर्षांनंतर ओढ्याला पूर आल्याने निमगाव- व्याहळी आणि वरकुटे खुर्दचा रस्ता बंद झाला होता. बापूभाई नाल्यात आणि गोतोंडीतील ओढ्याला पूर आल्याने इंदापूर- बारामतीची वाहतूकही काही तास ठप्प झाली होती. 

यंदा प्रथमच निमगाव केतकीच्या दुष्काळी पट्ट्यात वरुणराजाची जूनपासून मेहेरनजर आहे. इंदापूर तालुक्‍यातील सर्वांत मोठा आठवडे बाजार म्हणून निमगाव केतकीची ओळख आहे. भाद्रपदी बैलपोळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी येथील आठवडे बाजारात चार ते पाच जिल्ह्यांतील पारंपरिक व्यावसायिक, व्यापारी आले होते. मोठ्या बाजारामुळे उलाढालही मोठी असते. बाजार भरलेला असताना दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्याचा जोर एवढा प्रचंड होता, की पाऊण तासात संपूर्ण बाजारात हाहाकार उडाला. मारुती महादेव मंदिरानजीक असलेल्या ओढ्यावरील पुलावर लावलेल्या काही दुचाकी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

व्याहळीवरून येणाऱ्या ओढ्याला पंधरा ते वीस वर्षांनंतर एवढा मोठा पूर आल्याचे ग्रामस्थ सांगत होते. येथील आठवडे बाजारात परिसरातील दहा ते पंधरा गावांतील लोक येतात. बैलपोळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात गर्दी झाली होती. मात्र, अचानक आलेल्या पावसाने बाजाराचा बेरंग केला. त्यामुळे किमान दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

ओढ्याला आलेल्या पुरामुळे व्याहळीकडे जाणारा पूल आणि वरकुटे खुर्दला जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने बंद पडला होता. गेल्या कित्येक वर्षांत असा पाऊस पाहिला नसल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. बापूभाई नाला व गोतोंडी ओढ्याला अनेक वर्षांनंतर पूर आल्याने इंदापूर- बारामती रस्ताही काही काळ बंद झाला होता.

Web Title: marathi news marathi websites Indapur News pune news rain