बारामती नगरपालिकेविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार : अमर साबळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

बारामती : शहरातील श्री गणेश मार्केट उदघाटन प्रसंगी बारामती नगरपालिकेने राजशिष्टाचाराचे पालन केले नसल्याने राज्यसभेत या प्रकरणी आपण नगरपालिकेविरुध्द हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली.

बारामतीत आज पत्रकार परिषद घेत त्यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली. भाजपचे शहरप्रमुख यशपाल भोसले, प्रशांत सातव यांच्यासह अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. 

राजशिष्टारानुसार राज्यसभेचा सदस्य व या गावचा सुपुत्र या नात्याने आपले नाव निमंत्रणपत्रिकेत असणे अनिवार्य होते; दुर्देवाने नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हा राजशिष्टाचार पाळला नाही ही बाब निंदनीय व दुःखदायक असल्याचे ते म्हणाले. 

वास्तविक शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत व विरोधकांशी मैत्री जपण्याचा त्यांचा स्वभाव आहे, असे असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजशिष्टाचार डावलून त्यांच्या नावाला कमीपणा आणण्याचे काम केल्याचे साबळे म्हणाले. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी सूचना देऊनही या प्रकरणी नगरसेवकांनी त्या कडे दुर्लक्ष केले ही बाब योग्य नसल्याचे ते म्हणाले. 

या पुढील काळात बारामतीत होणा-या सर्व शासकीय बैठकांना खासदार या नात्याने आपल्याला निमंत्रित करण्याच्या सूचना आपण येथील उपविभागीय अधिका-यांना दिल्याचे सांगत या बैठकातून आपण नागरिकांची योग्य भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले. 

राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन केले जाईल व त्याचे नेतृत्व आपण करु असेही अमर साबळे म्हणाले.

Web Title: marathi news marathi websites Pune News baramati News Amar Sable