बैलगाडा शर्यत सुरू करणे पंतप्रधान मोदी यांच्या हातात : आढळराव पाटील

नागनाथ शिंगाडे
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

तळेगाव ढमढेरे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे शनिवारी रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथे एका विवाहाच्या निमित्ताने एकत्र आले. त्यांनी वधू व वरांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकत्रच स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

तळेगाव ढमढेरे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे शनिवारी रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथे एका विवाहाच्या निमित्ताने एकत्र आले. त्यांनी वधू व वरांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकत्रच स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

गेल्या पंधरवड्यापासून वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा चालू असल्याने दोघांमधील राजकीय वातावरण तापले होते. परंतु आज श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बबनराव कुटे यांचा मुलगा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लांडे यांच्या मुलीच्या विवाहाप्रित्यर्थ स्नेहभोजनानिमित्त वळसे पाटील व आढळराव पाटील हे एकत्र आले. यावेळी बैलगाडा मालकांनी दिलीप वळसे पाटील यांना 'बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार' याविषयी प्रश्न विचारला. तेव्हा 'खासदारांना विचारा' असे उत्तर वळसे पाटील यांनी दिले.

त्यानंतर खासदार आढळराव पाटील यांना हाच प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की, बैलगाडा शर्यत सुरू करणे हे वळसे पाटील व माझ्या हातात नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी खूप प्रयत्न केलेत व अजूनही प्रयत्न चालूच आहेत.' बैलगाडा शर्यत कधी सुरू होणार यावर बैलगाडा मालकांमध्ये अद्यापतरी संभ्रमावस्था असल्याचे आता उघड झाले आहे. 

यावेळी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विश्वास कोहकडे, बाजार समितीचे माजी संचालक रामभाऊ सासवडे, बापू शिंदे, बबनराव कुटे, प्रकाश लांडे, गणेश लांडे, नानासाहेब लांडे, भास्कर लांडे तसेच बैलगाडा मालक उत्तम कुटे, बबन डांगे, संपत खेडकर, केरूभाऊ कुटे, दत्तात्रेय कुटे आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi websites Pune News Bullock cart race Shivajirao Adhalrao Patil Dilip Valse Patil Narendra Modi