खेळाडूंसाठी कालबद्ध कार्यक्रम : बापट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे : ''वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत झोकून देऊन उत्तम कामगिरी करणारे खेळाडू निर्माण करण्यासाठी 'कालबद्ध कार्यक्रम' आखणार आहे. त्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करू दिला जाईल,'' असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिले. संस्कारक्षम खेळाडूंना सर्व पातळ्यांवर सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरातील क्रीडा सुविधा आणि अंमलबजावणीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा परिषदेचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. परिषदेचे समन्वयक योगेश गोगावले, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, क्रीडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, ऍथलेटिक्‍स मार्गदर्शक राम भागवत, रेखा भिडे, सुरेखा द्रविड, विद्यापीठाचे क्रीडाप्रमुख दीपक माने, ध्यानचंद पुरस्कार विजेत्या स्मिता शिरोळे आदी उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

बापट म्हणाले, ''क्रीडा क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. खेळामुळे व्यक्तिगत विकास होतो, जीवनातील ध्येय गाठण्यासाठी उपयोग होतो.'' 
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार व संघटना यांनी समन्वय राखून काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे लांडगे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या माध्यमातून क्रीडासंस्कृतीच्या संवर्धनासाठी या परिषदेत कार्यक्रम निश्‍चित केले जाणार असल्याचे परिषदेचे समन्वयक गोगावले यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites pune news Girish Bapat