पुणे: कचरा प्रकल्प रद्द करण्यासाठी जागरण-गोंधळातून खंडोबाला साकडे

संदीप जगदाळे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

हडपसर : हडपसरमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा डेपोला विरोध करण्यासाठी जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. वाघ्या-मुरळींनी नृत्याविष्कारातून खंडोबाची आराधना केली. 'हडपसरवासियांची इडापिडा टळून जाऊ दे' यासाठी खंडोबा देवाला साकडं घातले.

बहिरे व आंधळे झालेल्या पालिका प्रशासन व महापौर आणि पालकमंत्री यांना जाग आणण्यासाठी हा जागरण गोंधळ घालण्यात आला. कार्यकर्त्यांनी दिवटया नाचवल्या. हे आंदोलन शुक्रवारी रात्री हडपसर वेशीसमोरील उड्डाणपुलाखाली झाले. 

राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने हडपसर-रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव यासाठी हे अनोख्या प्रकारचे जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी पेटून उठत आता थांबायचे नाही, असा संकल्प केला व कोणत्याही परिस्थितीत या भागात नवीन कचरा प्रकल्प होऊ द्यावयाचा नाही असा ठाम निर्धार केला. यावेळी सत्ताधा-यां विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

या प्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक वैशाली बनकर, अशोक कांबळे, रूक्साना इनामदार, माजी नगरसेवक सुनील बनकर, सागर राजेभोसले, डाॅ. शंतनू जगदाळे, कलेश्र्वर घुले, मामा अल्हाट, उत्तम आढाव, अप्पा गरड, तुषार जाधव, दत्तात्रय झेंडे यांसह मोठया संख्येने नागरिक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधी पक्ष नेते चेत तुपे म्हणाले, महापौर व आयुक्त, पालकमंत्री आणि मुख्यंत्र्याना गेली चार महिने लेखी, तोंडी विनंती करुन आणि आंदोलने करून देखील आंदोलकांचा आवाज एेकू येत नाही. त्यामुळे त्यांची कानउघडणी करण्यासाठी आम्ही सलग आठ दिवस आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये भोंगा वाजवणे, तोंडावर काळी पट्टी बांधणे, भजन, थाळी वादन, जागरण-गोंधळ ही आंदोलने झाली आहेत. पुढील दोन दिवसात कचरा तुला व जोडो मारो आंदोलने करण्यात येणार आहे. हडपसरची कचरा पेटी होवू देणार नाही, यासाठी वाटेल ती किंमत मोजू ही प्रत्येक नागरिकाची भूमीका आहे.  

हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे म्हणाले, 'हडपसर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या नविन कचरा प्रकल्पाचे काम त्वरित थांबवावे. अन्यथा येथे रोकेम व अजिंक्य हे दोन सुरू असलेले प्रकल्प बंद पाडू. सलग 8 दिवस सदनशीर मार्गाने आंदोलन केल्यानंतरही जनतेचा तीव्र विरोधाला सत्ताधारी जुमानत नसतील तर, घनकचरा विभागाच्या गाड्या आडवणार, फोडणार आणि जाळणार.'

Web Title: marathi news marathi websites pune news hadapsar dumping ground