मराठी शाळा बंदविरोधात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

पुणे : शालेय शिक्षण विभागाने मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन केले. 

पूर्वप्राथमिक शिक्षणाबाबत कायदा करावा, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयाची अट शिथिल करावी, शुल्कवाढ करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, या सर्व प्रलंबित मागण्याही त्यांनी निवेदनाद्वारे केल्या. या आंदोलनात कल्पेश यादव, विक्रांत अमराळे, सचिन ननावरे, अभिषेक जगताप, आकाश शेडगे, शशांक अमराळे, अभिजित येनपुरे, कृष्णा मोहिते सहभागी झाले होते. 

अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेनेदेखील शाळा बंदच्या निर्णयाची होळी केली. सरकारला हा निर्णयच घ्यायचा असेल, तर सर्व मुलांना मोफत वाहतुकीची सुविधा द्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शरद जावडेकर यांनी केली आहे. या आंदोलनात दादासाहेब सोनावणे, मधुकर निरफराके, श्रीकांत पुपलवाड, दीपक वायाळ आदी सहभागी झाले होते.

Web Title: marathi news marathi websites pune news marathi schools MNS