मावळ तालुक्यातील शिक्षकांची ट्रेकिंगसह स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

टाकवे बुद्रुक (जि. पुणे) : 'आरोग्यातून समाजसवेकडे' हा वसा व ध्येय घेऊन मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक तीन वर्षांपासून ट्रेकिंगसह स्वच्छता मोहीम राबवित आहे. त्यासाठी गुरूजनांनी 'टीचर फ्रेन्ड्स ग्रुपची 'स्थापना केली आहे. या ग्रुपने स्वच्छता मोहीम, श्रमदान, मदतनिधी,आदर्शाचा गौरव, वाचन संस्कृतीची जोपासना हे उपक्रम राबवले आहे.या पुढे आरोग्य मार्गदर्शन, रक्तदान व वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्याचा संकल्प 'शिक्षक मंडळीनी 'केला आहे. 

टाकवे बुद्रुक (जि. पुणे) : 'आरोग्यातून समाजसवेकडे' हा वसा व ध्येय घेऊन मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक तीन वर्षांपासून ट्रेकिंगसह स्वच्छता मोहीम राबवित आहे. त्यासाठी गुरूजनांनी 'टीचर फ्रेन्ड्स ग्रुपची 'स्थापना केली आहे. या ग्रुपने स्वच्छता मोहीम, श्रमदान, मदतनिधी,आदर्शाचा गौरव, वाचन संस्कृतीची जोपासना हे उपक्रम राबवले आहे.या पुढे आरोग्य मार्गदर्शन, रक्तदान व वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्याचा संकल्प 'शिक्षक मंडळीनी 'केला आहे. 

शिक्षक तसे बुद्धीजिवी वर्ग, शारीरिक कष्टाची कामे त्यांच्या वाटायला फारसी येत नाही, पण ताणतणावाच्या कामाचा वेग सतत त्यांच्या पाठीशी उभा ठाकला आहे. शैक्षणिक कामासह शासनाच्या विविध जबाबदारीच्या कामात त्यांचा मोठा सहभाग घेतला जातो. शारीरीक कष्ट नसल्याने आरोग्याच्या तक्रारी त्यांनाही सतावत आहे. बदलती जीवनशैली, वाढते पर्यावरणाचे प्रदूषणाचा सर्वाच्याच आरोग्य परिणाम होत आहे. उत्तम आरोग्य जपण्यासाठी हिवाळ्यात व्यायामाला घराबाहेर पडणा-यांची संख्या मोठी आहे. त्यात कोणी धावते, कोणी चालते, कोणी सूर्यनमस्कार, योगासने, जोरबैठका, जिमखाना गाठते,या सगळ्या पर्यायांचा सोबत टीचर फ्रेन्ड्स ग्रुपने आरोग्यातून समाजसवेकडे हा उपक्रम तीन वर्षांपासून सुरू केला आहे. 

सकाळी माॅर्निग वाॅकला किंवा जिमला बाहेर पडलेल्या एक दोन हौशी शिक्षकांच्या मनात या कल्पनेचा उगम झाला, त्यांनी ही कल्पना सहकारी शिक्षकांच्या पुढे मांडली.त्यावर साधक बाधक चर्चा होऊन सर्वानी एकत्र येऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची यावर एकमत झाले.

खेडया पाडयात नोकरी करणारे शिक्षक बांधव विसावा घ्यायला मात्र वडगाव, तळेगाव,कामशेत अशा शहर परिसरात आहे.त्यांनी या ग्रुपची स्थापना करून 'व्हॅटसअप ग्रुप' सुरू केला आहे.गुप मधील सुमारे एकोणचाळीस सभासदांनी दर रविवारी सकाळी सहा वाजता एकत्र जमून सुरूवातीला टेकडी, डोंगर, किल्ल्यावर टेकिंग सुरू केले. 

तेथे पोहचल्यावर परिसराची अस्वस्थता पाहून अस्वस्थ झालेल्या गुरूजनांनी हात झाडू खराटा घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. या ग्रुपने आतापर्यंत भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरावडेश्वर, फिरंगाई डोंगर नाणोली, पिरचा डोंगर, चक्रेश्वर, आढलेचा डोंगर, चौराई डोंगर, नागफणी कुरवंडे,बेडसे लेणी, कार्ला लेणी, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणापेठ, राजमाची, सज्जनगड, बारामोटेची विहीर, कासपठारावर ट्रेकिंग तर केले या शिवाय स्वच्छता मोहीम राबवली. तीन वर्षात एक ही रविवार ट्रेकिंग शिवाय गेला नाही, प्रत्येक रविवारी ग्रुपच्या सदस्यांनी भरभरून साथ दिली.

घोरावडेश्वर नियमितपणे होणाऱ्या ट्रेकिंग मध्ये वेळोवेळी श्रमदान करून येथील तळयाच्या खोदकामास सर्वजण हातभार लावीत आहे.या ग्रुपचे काम येथे थांबत नाही, जुलै२०१६ला अहिरवडेतील बशीर महमद आतार या प्राथमिक शिक्षकाचे हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यावेळी या ग्रुपच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी दोन लाख एकशे सहेचाळीस रूपयांची आर्थीक मदत केली.

शिक्षक बांधव किंवा त्याच्या कुटुंबियांनी एखाद्या क्षेत्रात यश मिळविले तर त्याच्या घरी जाऊन त्याचे कौतूक करण्याची रीत या ग्रुपने जोपासली आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रुपमधील सदस्याला प्रेरणादायी पुस्तकाची भेट दिली जाते. या पुढील काळात आरोग्य, रक्तदान, वृक्षारोपण हे उपक्रम राबविण्याचा या सदस्यांचा मानस आहे. या शिवाय वेगवेगळ्या किल्ल्यांच्या ट्रेकिंग सह कळसूबाई शिखर गाठायचे आहे.

या ग्रुपचा सदस्य होण्यासाठी सलग तीन रविवार ट्रेकिंगला येणे आवश्यक आहे, यात कोणाला कुठेही पद नाही, सर्वाच्या मताचा आदर केला जातो, राजकीय पक्ष, संघटना विरहित केवळ आरोग्यासाठी काम करणारा तालुक्यातील एकमेव ग्रुप आहे

Web Title: marathi news marathi websites Pune News Positive news