महापालिकेच्या जागा अतिक्रमणांच्या विळख्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणे : शहरातील अतिक्रमणांवर हातोडा उगारणाऱ्या महापालिकेच्या मालकीच्या तब्बल दीडशेहून अधिक जागा अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागांवर तात्पुरती बांधकामे, झोपड्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि गोदामे थाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे बहुतांशी जागांवर अतिक्रमण झाल्याची कल्पनाही प्रशासनाला नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी या जागा व्यावसायिकांच्या घशात जाण्याची भीती आहे. 

दरम्यान, या जागांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला असून, त्यासाठी महापालिकेच्या मिळकती आणि त्यांचे स्वरूप याची माहिती मागविली आहे. 

शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून रोज अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यात प्रमुख 153 आणि अन्य 45 रस्त्यांचा समावेश आहे. वारंवार कारवाई होऊनही दुकाने थाटणाऱ्या बेकायदा व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ही कारवाई प्रभावीपणे होत असली, तरी महापालिकेच्या जागा गिळंकृत होण्याच्या मार्गावर असल्याचे वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. 

महापालिकेकडे सद्यःस्थितीत 12 हजार 386 मोकळ्या जागा आहेत; मात्र या सर्व जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. काही भागात आधी झोपड्या उभारून बांधकामे केल्याच्या तक्रारी आहेत. उपनगरांमध्ये छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी शेड उभारून या जागा ताब्यात घेतल्या आहेत. काही मंडळींनी तर जागेचा मालक असल्याचे भासवून भाडे वसुलीचा उद्योग सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे अशा जागा बळकावल्या जाण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. 

महापालिकेच्या काही जागांवर विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार पाहणी करून ती काढण्यात येतील. त्यासाठी मिळकतींची माहिती एकत्रित करून कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल. ही कारवाई नियमित असेल. ज्यामुळे सर्व जागा ताब्यात घेणे सोयीचे होईल. 
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग

Web Title: marathi news marathi websites Pune news Pune Municipal Corporation Encroachment