पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पत्रकारांचे उपोषण

चिंतामणी क्षीरसागर
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा थकबाकीच्या कारणावरून बंद करण्यात आल्यामुळे गावाला चौदा दिवस झाले पाणी नाही. ग्रामपंचायत व महावितरण यांच्यात तुतु.. मैमै.. चालले आहे. दोन्ही विभागाने घेतलेल्या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. परिसरातील अनेक गावात ही समस्या आहे. ग्रामस्थांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येथील स्थानिक पत्रकारांनी ग्रामपंचायतीसमोर शुक्रवार ता. २९ पासुन उपोषन सुरू केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय माळशिकारे, राजेंद्र गलांडे, हेमंत गडकरी, सोमनाथ लोणकर, राजेश वाघ, सचिन वाघ उपोषणाला बसले आहेत. गावची सार्वजनिक समस्या असल्याने नागरीकांचा उस्फुर्त पाठिंबा उपोषणाला मिळत आहे.

महावितरणने वीज पुरवठा बंद करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी थकबाकीच्या कारणावरून वीज पुरवठा बंद केला होता. ग्रामपंचातीला महावितरणने हप्ते बांधून दिले होते. हप्त्याची रक्कम थकल्याने पुन्हा वीज पुरवठा बंद केला. सुमारे गेल्या पंधरा वीस वर्षाची थकबाकी ग्रामपंचायतीकडे आहे. आमच्या कार्यकाळातील वीज बील आम्ही भरू मागचा बोजा आमच्यावर का असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आहे. महावितरण थकबाकीचे हप्ते भरा मगच वीज पुरवठा सुरू करतो असे म्हणते दोन्ही विभागाचे गेल्या चौदा दिवसांत भांडण मिटत नाही.

याबाबत वर्तमान पत्रात आवाज उठवूनही सरकारला जाग येत नाही. नागरीकांना सुविधा पुरवणे ही ग्रामपंचयतीची जबाबदारी आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या वेळी वीज पुरवठा बंद केला होता त्यावेळीपासून थकबाकीदारांकडुन कसून वसुली केली असती. बोगस जोड काढले असते. पाण्याची गळती रोकली असती तर बऱ्यापैकी वीज बचत झाली असती पण ग्रामपंचयतीने याबाबत उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आता स्थानिक पत्रकरांनी उपोषण सुरू केले आहे.

Web Title: marathi news marathi websites pune news Water Supply Baramati