राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पदनियुक्ती सभा

marathi news NCP youth congress meeting
marathi news NCP youth congress meeting

नवी सांगवी - "शासनाच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. तेव्हा शासनाच्या विरोधात राज्यभर शंभरपेक्षा अधिक मोर्चे काढून जनसामान्यांची खदखद दाखवून देऊ आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या खदखदीचे मतात रुपांतर करुन अजितदादांना मुख्यंमत्री करु." असे उद्गार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनी पिंपळे गुरव येथे काढले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयोजित युवक मेळावा व पदनियुक्ती सभेत त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, सिनेट सदस्य अभिषेक बोके, संगिता ताम्हाणे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, सुनिल गव्हाणे, फजल शेख उपस्थित होते. 

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात पार पडलेल्या या युवक मेळाव्यात शहरातील पहिल्या टप्यातील २५ कार्यकर्त्यांना पदनियुक्ती पत्र देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष कोतेपाटील म्हणाले, "राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पाचहजार पेक्षा अधिक सुशिक्षित व प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. केंद्रात सत्तेवर येण्यापुर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. परंतु रोजगार तर मिळालाच नाही. नोटाबंदीमुळे उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी वाढली. विकासाचा दर घसरला. जगभर फिरुन आलेल्या मोदींनी भारतात किती परदेशी गुंतवणूक वाढविली?"

कार्यकर्त्यांनी केवळ कार्ड छापण्यापुरते पद स्विकारु नये, अथवा स्वतःचा विरोधक पलिकडे म्हणून मी इथे असे न करता राष्ट्रवादीच्या विचारांची कास धरली पाहिजे. मनसेचा केवळ एक नगरसेवक महापालिकेत शहरात आवाज उठवू शकतो. परंतु आपले ४० नगरसेवक असूनही एक वाक्यता दिसत नाही. याबद्दल जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी खदखद व्यक्त केली. शहराध्यक्ष विकाल वाकडकर यांनी प्रास्ताविक केले. तर युवती अध्यक्ष वर्षा जगताप यांनी आभार मानले. 

कार्यकारणीत उपाध्यक्ष शेखर काटे, हर्षवर्धन भोईर, विशाल पवार, कुणाल थोपटे, सागर तापकीर, मयुर जाधव, निखिल नढे, अलोक गायकवाड, मंगेश बजबळकर, राजेंद्र थोरात, निलेश निकाळजे, सरचिटणीस निलेश सस्ते, बाळकृष्ण बाणपट्टे, सैईफ खान, प्रमोद ताम्हाणे, योगेश मोरे, सनी ढाळे, अमेय नेरूळकर, अब्दुल शिकलगार, चैतन्य चोरडिया, साईश कोकाटे, प्रतिख साळुंखे, अमोल पाटील, अजिंक्य विनोदे यांचा समावेश आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com