गळा चिरून विद्यार्थ्याचा खून, निगडीतील धक्कादायक घटना 

संदीप घिसे 
मंगळवार, 13 मार्च 2018

पिंपरी - निगडीतील पूर्णानगर भागात काल (सोमवार) एका पंधरा वर्षाच्या विद्यार्थ्यांचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक गटना घडली. वेदांत जयवंत भोसले (वय १५ रा. पूर्णानगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास एकजण जखमी अवस्थेत पूर्णानगर येथे पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना वेदांत जखमी अवस्थेत दिसून आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकत होता. मैत्रिणीसोबत अभ्यास केल्यानंतर रात्री तो तिला सोडवण्यासाठी गेला होता. तिला सोडून तो परत घरी येत असताना हा हल्ला झाला. प्रेमप्रकरणावरून त्याचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत तपास सुरू आहे

Web Title: marathi news nigdi pune news murder case