ओतूरमध्ये चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न

पराग जगताप
बुधवार, 21 मार्च 2018

ओतूर - येथे मंगळवारी (ता.20) पहाटे चार ते पाच जणांच्या चोरट्याच्या टोळीने चार ठिकाणी चोऱ्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका जागी आठ हजार रुपये व हातातील मनगटी घड्याळ चोरुन नेले.

ओतूर - येथे मंगळवारी (ता.20) पहाटे चार ते पाच जणांच्या चोरट्याच्या टोळीने चार ठिकाणी चोऱ्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका जागी आठ हजार रुपये व हातातील मनगटी घड्याळ चोरुन नेले.

साधारणता रात्री दीड वाजे दरम्यान नगर कल्याण महामार्गावरील ओतूर गावच्या हद्दीत कोळमाथ्यावर बापूसाहेब दशरथ डुंबरे याच्या घराची खिडकी तोडताना आवाज झाल्याने त्याचा मुलगा मनोज उठला व त्याने आरडा ओरडा केल्यामुळे चोरटे पळुन गेले. त्यानंतर, ब्राम्हणवाडा रोडला आत्माराम गाढवे याच्या घराशेजारी पडवीत राहणारे त्याचे भाडेकरु संदिप हरिभाऊ शिंदे यांच्या खिडकीचे गज तोडुन व वाकुन एक चोरटा घरात शिरला. त्यानंतर त्याने दरवाजा उघडुन इतर चोरट्यांना आत घेतले मात्र दरवाज्याचा आवाज झाल्याने शिंदे उठले तर त्याना आठरा ते वीस वयाचे चार तरुण उसतोडायचे कोयते हातात घेवुन घरात उभे दिसले. त्याना पाहताच शिंदे ओरडले त्यामुळे चोरट्यानी धुम ठोकली. शिंदे याच्या घराजवळ तीन चोरट्याच्या चपला आजुबाला पडलेल्या आहेत. 

त्यानंतर शेखर आत्माराम गाढवे यांनी पोलिसांना माहिती दिली, रात्रीच पोलिसही घटनास्थळी आले. अशा प्रकारेच आणखी दोन ठिकाणी चोरट्यांनी चारीचा प्रयत्न केला परंतु, त्यांना तेथूनही पळ काढावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, या चोरीच्या घटनेची कोणतीही तक्रार मंगळवारी रात्री पर्यंत ओतूर पोलिसात दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Web Title: marathi news otur robbery crime