1 कोटींच्या बिटकॉइनची परस्पर विक्री; निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

संदीप घिसे 
शुक्रवार, 16 मार्च 2018

पिंपरी - एक कोटी रुपयांच्या बीटकॉइनची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी - एक कोटी रुपयांच्या बीटकॉइनची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, रुपेश सिंग, हेमंत चव्हाण, काका रावडे, हेमंत सुर्यवंशी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. भीमसेन बाबुराम आगरवाल (वय ६५ रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून सप्टेंबर २०१६ मध्ये फिर्यादी अग्रवाल यांना एक कोटी रुपयांचे बिटकॉईन घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या बिटकॉइनची ऑनलाईनद्वारे परस्पर विक्री करून फसवणूक केली. याबाबत निगडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: marathi news pimpri bitcoin 1 crore rupees