पंचवीस लाखांचा गुटखा बसमधून जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

पिंपरी - इंदूरहून पुण्याकडे खासगी बसमधून आणलेला २५ लाखांचा गुटखा जप्त केला. अन्न व औषध विभाग आणि गुन्हे शाखा यांनी निगडीत ही कारवाई केली. 

पिंपरी - इंदूरहून पुण्याकडे खासगी बसमधून आणलेला २५ लाखांचा गुटखा जप्त केला. अन्न व औषध विभाग आणि गुन्हे शाखा यांनी निगडीत ही कारवाई केली. 

अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त नारगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरहून बसने गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध विभाग आणि गुन्हे शाखा यांनी सापळा लावला. बस आल्यावर पोलिसांनी ती थांबविली. बसची झडती घेतली असता त्यात गुटख्याची पोती आढळून आली. ७१ लाखांच्या या बस ताब्यात घेऊन सध्या निगडी पोलिस ठाण्यासमोर उभ्या केल्या आहेत. श्रीकांत चांदेकर आणि कृष्णमुरारी राजेंद्र गुप्ता (रा.मेदनकर वाडी, चाकण) यांच्यासह अन्य तिघांवर कारवाई केली.

Web Title: marathi news pimpri news gutkha seized crime