चिंचवडला मध्यवर्ती ठिकाणी कलादालन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पिंपरी - महापालिकेने चिंचवडमध्ये उभारलेल्या व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर सर्व सोयींनी युक्त नवीन कलादालन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मध्यवर्ती ठिकाणी हे कलादालन सुरू झाल्यास कलाकारांची चांगली सोय होणार आहे. मात्र, याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्‍यक आहे.

कलादालनाबाबत दृष्टिक्षेप 
 महापालिकेचे निगडी-टिळक चौकातील मधुकर पवळे कलादालन सध्या बंद स्थितीत
 सुरू असलेले दोन खासगी कलादालन : वालचंद कोठडिया आर्ट गॅलरी (प्राधिकरण) आणि पु. ना. गाडगीळ कलादालन (चिंचवड) 
 चिंचवडमध्ये कलादालन सुरू व्हावे, अशी कलाकारांची बऱ्याच दिवसांपासून मागणी
 दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी दिली होती तत्त्वतः मान्यता
 लोणावळा ते पिंपरी-चिंचवड या अंतरात मोजकेच कलादालन
 नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांचा ‘ब’ क्षेत्रीय सभेसमोर कलादालनासाठी प्रस्ताव 
 व्यापारी संकुल सध्या बांधून तयार फक्त कलादालनाची रचना करणे बाकी

कलादालनामुळे होणारे फायदे
 दीडशे कलाकृतींची सोय 
 चापेकर चौक, मुख्य बस थांबा, चिंचवड बाजारपेठ यांपासून जवळ 
 म्युरल्सचेही प्रदर्शन भरविणे होणार शक्‍य
 मध्यवर्ती ठिकाण आणि दाट लोकवस्तीमुळे मोठा प्रतिसाद शक्‍य

शहरात जागा उपलब्ध होईल, त्या ठिकाणी कलादालनाची सोय करण्यात येईल. त्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
- नितीन काळजे, महापौर.

चिंचवडमध्ये कलादालन सुरू व्हावे, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव ‘ब’ क्षेत्रीय सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
- अश्‍विनी चिंचवडे, नगरसेविका

Web Title: marathi news pimpri news kaladalan