ज्येष्ठांसाठी एक कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

पिंपरी - शहरातील एकूण लोकसंख्येच्या १८-२० टक्के असणारा ज्येष्ठ नागरिक हा घटक महापालिका स्तरावर आतापर्यंत दुर्लक्षित राहिला होता. मात्र, ज्येष्ठांची ही व्यथा जाणून घेत यंदा प्रथमच पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वसमावेशक असे ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. हे धोरण तयार करतानाच त्यासाठी स्वतंत्रपणे एक कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. महापालकेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठांमध्ये सध्या आनंदाचे वातवरण आहे.

ज्येष्ठांसाठी धोरण निश्‍चित करावे, अशी ज्येष्ठ नागरिक महासंघाची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी होती. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याचे गांभीर्य ओळखून धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. 
- सूर्यकांत मुथियान, कार्याध्यक्ष, महासंघ

राज्य सरकार ज्येष्ठ नागरिक धोरण आहे. त्या अनुषंगाने महापालिकेनेदेखील धोरण तयार करावे, अशी स्थानिक ज्येष्ठ नागरिक महासंघाची मागणी होती. त्यानुसार महापालिकेच्या वतीने प्रारुप आराखडा तयार केला होता. त्यावर ज्येष्ठांच्या हरकती व सूचना मागवून मागील आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब केला. आगामी सर्वसाधारण सभेसमोर हे धोरण सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- प्रवीण अष्टीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ज्येष्ठांसाठीच्या योजना
विरंगुळा केंद्र
विरंगुळा केंद्रात फिजिओथेरेपी, नेत्रतपासणी, प्रथमोपचार, रक्तदाब, रक्तशर्करा  तपासण्याची व्यवस्था, आरोग्य प्रशिक्षण सुविधा
शिक्षण कार्यक्रम सुनिश्‍चित करून विविध यंत्रणांच्या वापरातून त्यांना बळकटी देण्याचा प्रयत्न
आरोग्यविषयक, मानसिक समुपदेशनाची सुविधा 
खासगी रुग्णालय व तज्ज्ञांनाही त्यात सहभागी करून घेणे
विविध करमणूक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन
ग्रंथालयाची सुविधा मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे
सिनेमागृह, नाट्यगृहात सवलतीच्या दराने प्रवेश देणे. आसने आरक्षित करणे
नाना-नानी उद्यानांसारख्या सुविधांची व्यवस्था
शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था व त्यात आसने आरक्षित करणे
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करणे
सामाजिक कार्यात क्रियाशील असणाऱ्या पाच जणांचा गौरव
सक्षम असणाऱ्यांना अर्धवेळ नोकऱ्या, लघुउद्योगामध्ये प्राधान्य देणे
लघुकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे
महापालिकेकडून नवीन टाउनशिप किंवा मोठ्या संकुलास परवानगी देताना तेथे वृद्धाश्रम स्थापनेसाठी प्रयत्न करणे
ज्येष्ठ नागरिक संघांना, महासंघांना, विरंगुळा केंद्रांना आवश्‍यक साहित्य, सेवांसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे
आधारकार्ड दाखविल्यानंतर महापालिकेच्या सर्व सुविधा मिळाव्यात

Web Title: marathi news pimpri news old people one crore