मानवी चुकांमुळेच द्रुतगतीवर अपघात

सुधीर साबळे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात मानवी चुकांमुळेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी ‘जेपी रिसर्च इंडिया’ने एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान सर्वेक्षण केले. त्यात ५७ टक्‍के अपघात वाहनचालकांनी सीटबेल्ट न लावल्याने झाल्याचे आढळून आले आहे.

द्रुतगतीवर वेगमर्यादा प्रतितास ८० किलोमीटर आहे; मात्र वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत आहे. 

मोटारींचे अपघात सर्वाधिक
गेल्या वर्षभरात मोटारींचे अपघात सर्वाधिक झाले आहेत. त्यात ६१ टक्‍के अपघातांत व्यक्‍ती मरण पावल्या आहेत. ६६ टक्‍के अपघात गंभीर स्वरूपाचे होते. किरकोळ अपघातांचे प्रमाण ५२ टक्‍के आहे. ट्रक अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यात गंभीर अपघातांची टक्‍केवारी २२ आहे. 

उपाययोजना हव्यात
पायाभूत सुविधा अधिक सक्षम कराव्यात
डाव्या बाजूप्रमाणे पहिल्या लेनच्या बाजूसही लोखंडी पट्ट्या बसवणे
पहिल्या लेनच्या बाजूस लोखंडी पट्ट्या नसल्याने १५ टक्‍के अपघात
डाव्या बाजूचे लोखंडी खांबही अपघातास निमंत्रण देत असून, त्यामुळे २० टक्‍के अपघात झाले आहेत.

कारवाईत सातत्य हवे...
मोटार चालवताना सीटबेल्ट घालणे बंधनकारक आहे; मात्र वाहनचालकांकडून सर्रासपणे नियम मोडला जातो. सीटबेल्ट न घालणाऱ्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईत सातत्य आवश्‍यक आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव वाचू शकेल. सीटबेल्टची तपासणी करण्यासाठी एक ठिकाण निश्‍चित न करता त्यामध्ये सातत्याने बदल करावा.

1) पादचाऱ्यांना जाण्यास बंदी असूनही सरपणाची मोळी डोक्‍यावर घेऊन मार्ग ओलांडणाऱ्या महिला.
2) पहिल्या लेनमधून जाणारे ट्रक. 
3) लेन कटिंग करून मोटारीला ओव्हरटेक करणारा ट्रक 
4) घाट रस्ता असूनही एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे मोटारचालक.

Web Title: marathi news pimpri news pune news express highway accident human