दिव्यांगांचा डबा काढल्याने प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

पिंपरी - सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेसला दिव्यांगांसाठी असणारे डबे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी काढल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान, सिंहगड एक्‍स्प्रेसला अपंगांसाठीचा एक डबा कार्यरत असून, दुसरा डबा लवकरच बसवण्यात येणार आहे. प्रगती एक्‍स्प्रेसचा एक डबा मंगळवारपासून बसवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दहा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सिंहगड एक्‍स्प्रेसचा एक डबा देखभाल दुरुस्तीसाठी काढला. या डब्यातून नोकरी, व्यवसायासाठी रोज मुंबईला ३० ते ४० प्रवासी ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता हा डबा काढला आहे. या संदर्भात दिव्यांग प्रवाशांनी रेल्वेच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी संदीप कणसे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. पुण्याबरोबरच चिंचवड आणि लोणावळ्याला या डब्यामध्ये चढउतार करणारे प्रवासी आहेत, असे त्यांनी सांगितले.

रेल्वे गाड्यांना असणाऱ्या डब्यांच्या देखभालीचे वेळापत्रक निश्‍चित केलेले असते. त्यानुसार सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेसला असणारे दिव्यांगांचे डबे देखभाल दुरुस्तीसाठी काढले आहेत. ते सर्व डबे लवकरच बसविण्यात येणार आहेत. दिव्यांग प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर त्यांच्या संदर्भातील घोषणा करण्यात येईल. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: marathi news pimpri news sinhgad express handicaped