पिंपरी शहरात विज्ञान दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी - शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांद्वारे बाल वैज्ञानिकांचे भावविश्‍व उलगडले. मनोरंजक विज्ञान दालन व ऊर्जा दालनाला भेट देऊन विज्ञानाचा आविष्कार चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. या वेळी विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पार्कमध्ये ठेवलेल्या विमानासमवेत सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांनाही आवरला नाही.

पिंपरी - शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांद्वारे बाल वैज्ञानिकांचे भावविश्‍व उलगडले. मनोरंजक विज्ञान दालन व ऊर्जा दालनाला भेट देऊन विज्ञानाचा आविष्कार चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. या वेळी विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पार्कमध्ये ठेवलेल्या विमानासमवेत सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांनाही आवरला नाही.

पालिकेचे चिंचवड येथील सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने सायन्स पार्कमधील वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती घेतली. विज्ञान दिनी सायन्स पार्कची विद्यार्थ्यांनी सफर केली. २१ शाळांमधील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी विज्ञान केंद्राला भेट दिली. विद्यार्थ्यांनी तारांगण, विज्ञान फिल्म व थ्रीडी शो पाहिला. या वेळी घेतलेल्या प्रश्‍नमंजूषेत ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

अल्फोन्सो हायस्कूल काळेवाडी, गोदावरी हिंदी विद्यालय, क्रिएटिव्ह स्कूल रावेत या शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. डायनॉसोर, शास्त्रज्ञ अशा असंख्य प्रकारची माहिती घेतली. सायन्स पार्कचे प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील पोटे यांनी माहिती दिली. 

मिल्किवे शाळा
पिंपले निलख येथील मिल्किवे शाळेत दररोजच्या जीवनात आपण विज्ञानाचा वापर करतो. यावर अनेक प्रात्यक्षिके दाखवून चिमुकल्यांना विज्ञानाची माहिती दिली. पाण्याच्या दाबावर चालणारे कारंजे, रंगाची पिचकारी, पाण्याच्या वाफेच्या शक्तीवर चालणारी बोट, लोहचुंबकाचा वापर करून धान्यातील लोखंडाच्या कणाचा शोध, दिशादर्शक होकायंत्राचा वापर, बर्हिगोल भिंगाचा वापर करून सूक्ष्म वस्तूचा अभ्यास, अग्नी तयार करणे, दृष्टिसातत्य यावरील खेळणी, अशा अनेक प्रयोगांद्वारे मुलांना मनोरंजनात्मक माहिती दिली. प्राचार्य डॉ. गजानन सावंत, समन्वयिका सई संकपाळ, उज्ज्वला लोखंडे, मनीषा पाटील, तेजस्विनी जाधव, गौरी चव्हाण, रूपाली वाडकर, पूर्वा हरकल यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली.  

यशस्वी विद्यालय 
यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चिंचवड येथील विद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, मुख्याध्यापिका शोभा देवकाते, संतोष काळोखे उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी सुभाष देवकाते यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगितले. 

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगावमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले. विज्ञान प्रदर्शनात शाळेत मुलांनी उत्तम अशा प्रतिकृती निर्माण करून सहभाग घेतला. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य, सांघिक जबाबदारी गुण वाढीस लागल्याचे दिसून आले. मुख्याध्यापिका विद्या नाईक उपस्थित होत्या.

विद्यानंद भवन हायस्कूल
निगडीतील विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले. मुलांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण व्हावी, या हेतूने विज्ञान  प्रदर्शन भरविले. या वेळी विज्ञानावर आधारित प्रश्‍नमंजूषा हलीमा खान यांनी सादर केली.  स्मिता कासार यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: marathi news pimpri Science day