पोलिस भरती - २१३ जागा, ४९ हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे - शहर पोलिस भरती प्रक्रियेच्या तारखेमध्ये पोलिस प्रशासनातर्फे बदल केला असून, भरती प्रक्रिया ७ मार्चऐवजी बदललेल्या वेळापत्रकानुसार १२ मार्चपासून होणार आहे. या भरतीसाठी तब्बल ४९ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे. राज्यात विविध जिल्ह्यांतील भरतीच्या तुलनेत पुण्याच्या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.

पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस शिपाई पदाच्या २१३ जागांसाठी संगणकीकृत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया यापूर्वीच राबविण्यात आली. त्यानंतर ७ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रक्रिया पाच दिवसांनी पुढे ढकलली आहे. आता १२ मार्चपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात पोलिस भरती होईल, अशी माहिती मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले. 

अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार न घडता पोलिस भरती प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी, यादृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक आणि सहाशे पोलिस कर्मचारी भरती प्रक्रिया व बंदोबस्तासाठी 
कार्यरत असतील.

अशी होणार प्रक्रिया
शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी आणि त्यानंतर १५०० मीटर धावण्याची नोंद
अर्ज ४९ हजार उमेदवारांनी केले, तरी प्रत्यक्षात ४५ हजारांपर्यंतच या प्रक्रियेत सहभागी होतील.
आठ हजार महिला, तीन हजार बॅंडपथकासाठीचे उमेदवार, तर उर्वरित ३८ हजार उमेदवार पुरुष भरती प्रक्रियेत सहभागी होणार.
जिल्हानिहाय पोलिस भरती प्रक्रिया; त्यामुळे पुण्यातील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या दोन ते तीन हजारांनी कमी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news police recruitment pune