जुन्नरच्या आदिवासी भागातील खडकवाडी शाळेस ई - लर्निंग सुविधा    

दत्ता म्हसकर
रविवार, 14 जानेवारी 2018

जुन्नर - आदिवासी भागातील खडकवडी येथील जिल्हा परिषद शाळेस जुन्नर वन विभागाचे वनपाल शिवाजी सोनवणे व वनरक्षक बारमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत इयत्ता पहिली ते पाचवी विदयार्थ्यांसाठी ईं- लर्निंग संच प्रदान करण्यात आला. आहे. ई - लर्निंग संचाचे उदघाटन वनपाल शिवाजी सोनवणे व वनरक्षक बारमुख, ग्रामपंचायत सदस्या मिना शेळकंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास हिले व उपाध्यक्ष पुनम रघतवान यांच्या हस्ते करण्यात आले.

आदिवासी मुले या सुविधांपासून दूर होती. त्यामुळे त्यांना माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान या संचामुळे विद्यार्थ्याना निश्चित होणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे, असे वनपाल सोनवणे यांनी प्रतिपादन केले. यावेळी लता कोळप, आशा हिले, कासाबाई दिवटे, होनाबाई हिले, हनुमंत उतळे, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक होना गवारी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन दिलीप वाळके यांनी केले. विद्यार्थी ऋुतुजा हिले, वैभव खुटाण यांनी मनोगत व्यक्त केले. आभार आरती मोहरे यांनी मानले. 

Web Title: marathi news pune aadivasi schools students e learning facility