जुन्नरला 'आडतास'चे उत्तम कांबळेच्या हस्ते प्रकाशन

दत्ता म्हसकर 
सोमवार, 5 मार्च 2018

पुस्तक म्हणजे मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या मूल्यांचा व संस्कृतीचा संच आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व 84 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे केले.

जुन्नर - पुस्तक म्हणजे केवळ पानांचा नव्हे तर मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या मूल्यांचा व संस्कृतीचा संच आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व 84 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे केले. जुन्नर येथील सेवानिवृत्त बँक अधिकारी गोपाळ बाळू गुंड लिखित आडतास पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी कांबळे बोलत होते. यावेळी सिनेअभिनेत्री विना जामकर, माजी आमदार दिलीप ढमढेरे, ग्रामीण साहित्यिक राजकुमार घोगरे, लेखक विकास गोडगे, नगराध्यक्ष शाम पांडे, इर्जीक प्रकाशनचे संतोष डुकरे  तसेच तालुक्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उत्तम कांबळे म्हणाले, आडतास म्हणजे ज्याचा विकास करायचा राहतो किंवा चुकतो त्याची भरपाई करणे होय. कलावंत स्वतः गरिबीत जगत असला तरी नेहमी समाजामध्ये न्यायाचा तराजू म्हणून तो उभा राहत असतो. गुंड यांनी त्यांच्या संघर्षातून केलेले लेखन हे भावनेनेचे, संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. यावेळी अभिनेत्री विना जामकर, माजी आमदार दिलीप ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे संयोजन आदित्य गुंड, पूजा गुंड यांनी केले तर सूत्रसंचालन जालिंदर ढमाले यांनी केले. 
 

Web Title: marathi news pune book inauguration uttam kambale