गुजरातमध्ये चाळीस टक्के कुपोषण- घनश्‍याम शहा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - ""गुजरातमधील प्रगती समाजाच्या सर्व स्तरात पोचलेली नाही. त्याचा थेट परिणाम नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिसून आला. गुजरातमध्ये 40 टक्के कुपोषण असून, मानव विकास निर्देशांक खाली घसरला आहे,'' असे अहमदाबाद येथील प्रा. घनश्‍याम शहा यांनी व्यक्त केले. 

"आकलन' संस्थेतर्फे पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र व्होरा स्मृतिव्याख्यान आयोजित केले होते. त्यात "गुजरात मॉडेल - लेसन्स फॉर इंडिया' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी राजकीय विश्‍लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर उपस्थित होते. 

प्रा. शहा म्हणाले, ""भांडवली विकासाचे मॉडेल म्हणून गुजरात मॉडेलकडे पाहिले पाहिजे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "कॉपीराइट' आहे. गुजरातमध्ये वाढत्या बेरोजगारीतून सामाजिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. प्रत्येक जाती फक्त आपल्या समाजाची जबाबदारी घेत असल्याचे दिसत आहे. देशातही रोजगार निर्मितीचा वेग कमी झाला आहे. त्यातून अराजकतेचा धोका वाढला आहे. गुजरात मॉडेलची किंमत आता देशाला मोजावी लागत आहे.'' 

गुजरातमध्ये दरडोई उत्पन्न, आर्थिक विकास दर वाढला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. विकास म्हणजे काय? असा प्रश्‍न विचारणाऱ्यांना विकासविरोधी ठरविले जाऊ लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news Pune Ghanshyam Shah 40 percentage Malnutrition