दोन बिबट्याची सुखरूप सुटका

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जुन्नर - विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याची बिबट निवारा केंद्रातील रेस्क्यू सेंटरच्या पथकाने सुखरूप सुटका केली. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील गटवाडीतील बंगला वस्तीतील सुरेश पोटे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोन बछड्याची सुटका करण्यात डॉ. अजय देशमुख यांच्या रेस्क्यू सेंटरच्या पथकास यश आले आहे. यासाठी त्यांनी प्रथमच आधुनिक काठीचा वापर करून ही सुटका केली आहे. वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांना शेतकरी विजय कालेकर याने गुरुवारी ता.18 रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास विहिरीत बछडे पडले असल्याचे कळविले रघतवान यांनी रेस्क्यू पथकास दुपारी 4 वा. कळविले. नंतर डॉ.

जुन्नर - विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याची बिबट निवारा केंद्रातील रेस्क्यू सेंटरच्या पथकाने सुखरूप सुटका केली. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील गटवाडीतील बंगला वस्तीतील सुरेश पोटे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोन बछड्याची सुटका करण्यात डॉ. अजय देशमुख यांच्या रेस्क्यू सेंटरच्या पथकास यश आले आहे. यासाठी त्यांनी प्रथमच आधुनिक काठीचा वापर करून ही सुटका केली आहे. वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांना शेतकरी विजय कालेकर याने गुरुवारी ता.18 रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास विहिरीत बछडे पडले असल्याचे कळविले रघतवान यांनी रेस्क्यू पथकास दुपारी 4 वा. कळविले. नंतर डॉ. देशमुख यांचेसह महेंद्र ढोरे, शिवाजी मधे, दिलीप देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन तेथील ग्रामस्थाच्या मदतीने 15 फूट खोल विहिरीत पडल्यानंतर विहिरीच्या पाण्याजवळ खडकाळ भागावर बसलेल्या बछड्याना काठीच्या मदतीने वर काढून पिंजऱ्यात ठेवले आहे. 

Web Title: marathi news pune leopard save