मिल्खासिंग यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान

 मिल्खासिंग यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान

पुणे - दिघी येथील ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’च्या वतीने आयोजित केलेल्या (एआयटी) ‘पेस २०१८’ या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता झाली. या वेळी ज्येष्ठ धावपटू मिल्खासिंग यांच्या हस्ते ‘पेस १८’ आंतरमहाविद्यालयीन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, कॅडेट ट्रेनिंग विंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, आर्म्ड फोर्सेस, केआयएमएस, कमिन्स, डी. वाय. पाटील यांसह सोळाव्या क्रीडा महोत्सवात ५० महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे यजमानपद भूषवणारी ‘एआयटी’ ही संस्था १६ विविध क्रीडाप्रकारांत विजेती ठरली. यामध्ये महिलांच्या क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धा, स्क्वाश, फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलिबॉलसह सर्व खेळांना खेळाडूंचा सहभाग लाभला. 

मिल्खासिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपट ‘एआयटी’च्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मेजर जनरल जलज भोला यांनी सिंग यांचा सत्कार केला. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी राहुल सिंग याने काढलेले सिंग यांचे ‘हस्तचित्र’ त्यांना भेट दिले. ब्रिगेडियर अभय भट (निवृत्त) यांनी आभार मानले.

भरपूर मेहनत घेतली आणि चिकाटी ठेवली, तर तुमच्यासाठी काहीही अशक्‍य नाही. मात्र उद्दिष्ट गाठायचे असेल तर याला पर्याय नाही. पालकांनीही आपल्या मुलांवर मेहनत घ्यावी. ‘ऑलिंपिक’चे ‘गोल्ड मेडल’, जे मी ‘रोम ऑलिंपिक’मध्ये जिंकू शकलो नाही. तुमच्यापैकी कुणीतरी ते जिंकून आणावे, अशी माझी इच्छा आहे.
- मिल्खासिंग, माजी धावपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com