परीक्षेसाठी आत्मविश्वास महत्वाचा - प्रा. विजय नवले

कृष्णकांत कोबल
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मांजरी (पुणे) : "परीक्षेचा ताण येणे ही स्वाभाविक बाब असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे ", असे प्रतिपादन  मार्गदर्शक  प्रा. विजय नवले यांनी केले. 

न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी  'परीक्षेला जाता जाता'' या विषयावर प्रा. विजय नवले यांचे व्याख्यान "थ्री एफ"  या माजी विद्यार्थी संघाने  आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. आर. पवार, विश्वस्त शिवाजी कामठे, किरण पवार थ्री एफचे सदस्य सचिन हरपळे, गौरीशंकर कामठे, अमित हरपळे, ऋषिकेश कामठे, तानाजी अडागळे, प्रदिप चव्हाण आणि शंकर वायकर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रा. नवले म्हणाले, "परीक्षेच्या काळात टीव्ही आणि सोशल मीडिया चा वापर कमी करावा. पुढील सहा सात वर्षे मजा  करून उर्वरीत आयुष्य स्वतःला कोसत बसण्यापेक्षा हीच महत्वाची  वर्षे मेहनत करून पुढील आयुष्यात यश आणि सन्मान मिळवावा"  आपला देश महासत्ता बनवण्याचे उद्दिष्टय डोळ्यांसमोर ठेवल्यास आपोआपच आपणही समृद्ध होऊ. करिअर निवडताना आपण किती पैसे कमावू याचा  विचार प्राधान्याने करण्यापेक्षा आपल्याला काय करायला आवडते याचा विचार प्रथम करावा." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  किरण सरोदे यांनी केले. तर सचिन हरपळे यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: Marathi news pune news 10th exam preparation lecture

टॅग्स