निमसाखरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

राजकुमार थोरात  
गुरुवार, 1 मार्च 2018

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) येथे निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) येथे निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एनईएस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

आज (ता. 1) पासुन राज्यामध्ये दहावीची परीक्षा सुरु झाली आहे. निमसाखर (ता.इंदापूर) येथील एनईएस हायस्कूलमध्ये चालू वर्षापासुन दहावीचे परीक्षा केंद्र सुरु झाले आहे. शाळा समितीचे अध्यक्ष डॉ.एन.जी.रणवरे व संस्थेचे सचिव रवींद्र रणवरे यांच्या हस्ते सरस्वती पुजन करुन परीक्षेला सुरवात करण्यात आली. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख आर.एस.तावरे, प्राचार्य नवनाथ बागल, विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे उपस्थित होते. परीक्षाकेंद्रावरती निमसाखर येथील एन.ई.एस हायस्कुल, शहाजीनगर येथील कै.शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय, रेडणी येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, निरवांगी येथील पद्मपुषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयातील २०८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

Web Title: Marathi news pune news 10th exam starts walchandnagar