राजस्थान रिजनल लेव्हलसाठी ज्ञानसागरच्या सहा विद्यार्थांची निवड

संतोष आटोळे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

शिर्सुफळ : सावळ (ता. बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील सहा विद्यार्थ्यांची राजस्थान येथे होणार्‍या स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवासाठी महाराष्ट्रातून निवड करण्यात आली.

यामध्ये स्वयंम कुंभार, अमित कोळेकर, विनय आटोळे, ओंकार अनुसे, समर्थ बंडगर, निखिल बंडगर, या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी राजस्थान या ठिकाणी दि. 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यन्त होणार्‍या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवात  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे विद्यार्थी सन 2017 ला राज्यपुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहेत.

7 दिवसाच्या राजस्थानच्या रिजनल लेवल कॅम्पच्या विविध स्पर्धेची तयारी या विद्यार्थ्यांची करून घेण्यासाठी स्काऊट मास्तर दिपक बिबे, सागर लाड, अरुण जगताप, प्रशांत इवरे व मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे प्रयत्न करत आहेत. या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक प्रा.सागर मानसिंगराव आटोळे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Web Title: Marathi news pune news