‘आधार’मधील दुरुस्ती आता होणार लवकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘आधार’ कार्डातील दुरुस्तीसाठी महापालिकेने स्वखर्चाने ४० यूसीएल युनिट मशिन खरेदी करावेत, अशी विनंती केली आहे. महापालिकेनेही त्यास होकार दिला असून, लवकरच ही मशिन शहरात उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

पुणे - ‘आधार’ कार्डातील दुरुस्तीसाठी महापालिकेने स्वखर्चाने ४० यूसीएल युनिट मशिन खरेदी करावेत, अशी विनंती केली आहे. महापालिकेनेही त्यास होकार दिला असून, लवकरच ही मशिन शहरात उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड अशा सर्व बाबींसाठी आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. त्यातच नावातील बदल, पत्ता बदलणे, ‘आधार’ला मोबाईल क्रमांक लिंक करणे आदी ‘आधार’मधील दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मध्यंतरी आधार संख्या कमी असल्याने नागरिकांना आठ दिवसानंतरचे कुपन देण्यात येत होते. आता परिस्थितीत बदल होत असून आधार केंद्रांची तसेच आधार मशिनची संख्या वाढविण्यात यश आले आहे. 

जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘‘आधार केंद्रांमध्ये येणाऱ्या गर्दीपैकी २५ टक्के नागरिक हे फक्त नवीन नोंदणी करण्यासाठी येतात. मात्र, आधार दुरुस्तीसाठी ७० ते ७५ टक्के लोक येतात. पुण्यात १०८, पिंपरी-चिंचवडमध्ये ५४ आणि ग्रामीण भागात ४८ मशिनद्वारे आधार नोंदणी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी आधार दुरुस्तीसाठी २० यूसीएल कीट उपलब्ध करून दिले आहे. पुणे महापालिका आयुक्तांबरोबर याविषयी चर्चा झाली आहे. पुणे महापालिका ४० यूसीएल किट उपलब्ध करून देणार आहे. दुरुस्तीसाठीच्या मशिनची संख्या वाढल्यानंतर हे काम पाच ते सात मिनिटांत होणार आहे.’’ 

‘यूआयडी’कडे प्रस्ताव
जिल्हा प्रशासनाकडे असलेली १०० आधार मशिन नादुरुस्त आहेत. त्यामुळे नवीन आधार मशिन खरेदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून तसा प्रस्ताव ‘यूआयडी’कडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळाली तर आधार नोंदणीचे काम वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news aadhar card repairing municipal