सभेला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निषेध, ग्रामसभेत ठराव

चिंतामणी क्षीरसागर
मंगळवार, 30 जानेवारी 2018

वडगाव निंबाळकर : ग्रामसभेची माहिती मिळूनही सभेला उपस्थीत न राहीलेल्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचा कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. नेमणुकीच्या ठिकाणी राहत नसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत शासनाने कठोर भूमिका घ्यावी. अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत मंजुर करण्यात आला. 

वडगाव निंबाळकर : ग्रामसभेची माहिती मिळूनही सभेला उपस्थीत न राहीलेल्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचा कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. नेमणुकीच्या ठिकाणी राहत नसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत शासनाने कठोर भूमिका घ्यावी. अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत मंजुर करण्यात आला. 

सरपंच शैला भगत यांच्या अध्यक्षतेखाली येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात सोमवारी (ता. 29) दुपारी सभा पार पडली. यामधे बहुतांशी विभागाचे कर्मचारी सभेला उपस्थीत नव्हते. नागरीकांच्या विविध समस्या व सरकारी कामातील अडचणीबाबत ग्रामसभेत चर्चा होते. संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थीत असल्यास नागरीकांना त्वरीत माहीती होते. काही अडचणी असल्यास चर्चेतून मार्ग काढता येतो यासाठी शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सभेला हजर राहुन नागरीकांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश असूनही कर्मचारी हजर राहत नाही. शिक्षक, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, महावितरण, बीट अंमलदार, कृषी विभागाचे कर्मचारी गावात राहत नाहीत यामुळे नागरीकांची कामे वेळेत होत नाहीत. 

उपस्थीत नसलेल्या कर्मचाऱ्यांचा निषेदाचा ठराव हेमंत गडकरी यांनी मांडला. याला सर्वांनी मंजुरी दिली. ग्रामपंचायतीने गावात बसवलेली बाके निविदा न काढता खरेदी केल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी लाऊन धरला होता. ग्रामसेवकांची बदली करण्यात यावी असा मुद्दा बापुराव खोमणे यांनी मांडला याला सर्वांनी अनुमती दिली. बारामती पंचायत समितीचे गटनेते प्रदिप धापटे यांनी ग्रामसेवकाला सुनावले नागरीकांनी कागदपत्र सादर करूनही वरिष्ठ पातळीवर पोहचवली जात नाहीत. यामुळे कामे रखडली आहेत. ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या तीसऱ्या मजल्यावरील सभागृहात होते. यामुळे वृद्ध आपंगाना येता येत नाही. सभा ग्रामपंचायत आवारात घेण्याची मागणी केली. पाणी पुरवठा सुरळीत करणे, स्मशानभूमी दुरूस्ती, कचराकुंड्या ठेवणे याबाबत चर्चा करण्यात आली कुष्टरोग निर्मुलनाची प्रतिज्ञा यावेळी उपस्थीतांनी घेतली. ग्रामसेवक प्रकाश सोनवणे यांनी विषय वाचन केले. उपसरपंच उमाजी खोमणे, डीजी माळशीकारे, पोलीस पाटील शरद खोमणे, भाग्यवान चव्हाण, रविंद्र खोमणे, सुरेश आडागळे, सुनिता खोमणे, वसिम शेख, सचिन खोमणे यांनी उपस्थीत राहुन चर्चेत आपली मते मांडली.

 

Web Title: Marathi news pune news absent employees condemn by gramsabha