जुन्नरच्या महिला भूकर मापक लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

दत्ता म्हसकर
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

बांगरवाडी ता. जुन्नर येथील गट क्रमांक 21 व 22 मधील मोजणी झालेल्या जमिनीची क प्रत देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली होती.

जुन्नर : उपअधीक्षक कार्यालय भूमी अभिलेख जुन्नर येथील भुकर मापक वंदना दशरथ लोहकरे यांना शुक्रवारी दुपारी चार वाजणेच्या सुमारास एका मध्यस्थामार्फत 20 हजार रुपयांची लाच घेताना नारायणगाव ता. जुन्नर येथे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून रंगेहात पकडले.

याबाबत तक्रारदार यांनी बांगरवाडी ता. जुन्नर येथील गट क्रमांक 21 व 22 मधील मोजणी झालेल्या जमिनीची क प्रत देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली होती. आज ऑटो रिक्षा चालका मार्फत ही रक्कम नारायणगाव येथील आळेकर मार्केटच्या पार्कींग मध्ये स्वीकारण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत विभाग पुणेच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कांचन जाधव, पोलिस निरीक्षक राजू चव्हाण व सहकाऱ्यांनी केली.

Web Title: Marathi news Pune news acb arrested women officer