अपघातानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाने काढला पळ

Marathi News Pune News Accident Ambulance Driver
Marathi News Pune News Accident Ambulance Driver

वालचंदनगर - अपघातामध्ये सर्वसामान्य रस्त्यावरील नागरिक ही तातडीची मदत करुन रुग्णांना खासगी गाडीने रुग्णालयापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र सणसर (ता. इंदापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने चारचाकी गाडीला धडक दिल्यानंतर गाडी थांबवून चालकाने मदत करण्याऐवजी रुग्णवाहिकेसह पळून गेल्याची घटना घडली. 

शनिवार (ता. ३०) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर येथील सरकारी वकील अॅड. पांडुरंग गायकवाड हे चारचाकी गाडीने इंदापूर-बारामती मुख्य रस्त्याने जंक्शनहून बारामतीकडे निघाले होते. यावेळीच काटेवाडी (ता. बारामती) प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आरोग्य केंद्रातून डिसचार्ज झालेल्या रुग्णानांना घेवून बोरी गावाकडे चालली होते. सणसर जवळील पाटंबधारे विभागाच्या वसाहतीजवळ गायकवाड यांच्या चारचाकी गाडीचा व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. अपघातामध्ये इंडिका कारचे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर इंडिका गाडीमध्ये कोण जखमी झाले आहे का? याची चौकशी करण्याऐवजी रुग्णवाहिकेच्या चालकाने गाडीसह पळ काढला. गायकवाड यांनी अपघात झाल्यानंतर वालचंदनगर पोलिस ठाण्याला या अपघाताची माहिती देवून रुग्णवाहिकेसह चालक पळून गेल्याचे सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी या घटनेची चौकशी करुन चालकाचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.

गेल्या महिन्यामध्ये लासुर्णे जवळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने रस्त्याने जात असताना त्यांना युवक चक्कर येवून दुचाकीवरुन पडल्याचे दिसताच स्वत:च्या गाडीतून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले होते.स्वत:च्या खासगी गाडीचा रुग्णवाहिकेसारखा वापर केला होता. तर आज दुसरीकडे आरोग्य खात्याचे कर्मचारी अपघात करुन पळून रुग्णवाहिकेसह पळून जात असल्याचा विरोधाभास पहावयास मिळत आहे. सुदैवाने अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com