मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

एकबोटे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानुसार हे वॉरंट काढल्याचे समजते. एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटांत दंगल घडल्यानंतर एकबोटे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा तसेच आर्म ऍक्‍टच्या कलमान्वये शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, तर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता.

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 12 पथके तयार केली आहेत. 

एकबोटे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानुसार हे वॉरंट काढल्याचे समजते. एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटांत दंगल घडल्यानंतर एकबोटे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा तसेच आर्म ऍक्‍टच्या कलमान्वये शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, तर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळला. 

पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावल्याचा दावा करत हा गुन्हा रद्द करण्याची याचिका एकबोटेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुरवातीला एकबोटेंची याचिका ऐकण्यास न्यायालयाने नकार दिला होता. तत्काळ सुनावणीसाठी बुधवारी हे प्रकरण नव्या खंडपीठापुढे सादर केले होते. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेण्यास नकार देत दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश एकबोटे यांना दिले होते. त्यामुळे एकबोटे यांनी दुपारी दुसऱ्या खंडपीठापुढे आपली याचिका सादर केली. त्यानुसार न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत जामिनाचा अर्ज फेटाळला होता. त्यापूर्वी पुणे सत्र न्यायालयाने जानेवारीला एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अटक टाळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

एकबोटे यांना अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली होती. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. एकबोटे यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा शोध घेण्यात आला; परंतु अद्याप ते हाती लागले नाहीत. त्यांना फरारी घोषित करावे आणि अटक वॉरंट काढावे, अशी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title: Marathi news Pune news arrest warrant issued against Milind Ekbote in Koregaon Bhima riot