युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आशुतोष जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि इस्लामपूर शाखा यांच्यातर्फे आयोजित यंदाच्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

संमेलन रविवारी (ता. 11) इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात होणार आहे. संमेलनाचे उद्‌घाटन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

संमेलनाची सुरवात सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे व्हाया तुकाराम या पथनाट्याच्या सादरीकरणाने होणार आहे. उद्‌घाटन सत्रानंतर प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांची मुलाखत रवी बावडेकर आणि मनाली जाधव घेणार आहेत. तिसऱ्या सत्रात इरफान मुजावर लिखित आणि यशोधन गडकरी दिग्दर्शित "तेरे मेरे सपने' या एकांकिकेचे सादरीकरण केले जाणार आहे. संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित युवा कवींचे कवी संमेलन होणार आहे.

Web Title: marathi news pune news ashutosh javadekar