मांजरीत भाजपच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान                                               

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मांजरी : व्यवसाय, शिक्षण, राजकारण, समाजकारण आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे दोनशे महिलांना मांजरी बुद्रुक भारतीय जनता पार्टीच्या वतीने "स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार'' देवून गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील महिलांना आमदार माधुरी मिसाळ व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 

मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ व तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते.
 नगरसेविका उज्वला जंगले, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, माजी उपसरपंच शिवराज घुले, सन्मित्र बँकचे माजी संचालक बबनराव घुले, भाजपचे जिल्हा चिटणीस बाळासाहेब घुले, ओबीसी आघाडीचे विकास रासकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कोद्रे, गायत्री घुले, तेजश्री घुले, डॉ. रसिका शिवरकर, प्रतिक घुले आदी यावेळी उपस्थित होते. 

आमदार टिळेकर म्हणाले, "मांजरीचा पाणी प्रश्र्न हा येथील महिलांच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यांच्यातीलच काही महिलांचा सन्मान करताना मला आनंद होत आहे. मात्र, पाणी प्रश्र्न सुटेपर्यंत खऱ्या अर्थाने हा सत्कार परिपूर्ण होणार नाही. पाणी योजना आणि रेल्वे उड्डाणपूल असा सुमारे 100 कोटी रूपयांचा निधी देण्यात मला यश मिळाले आहे. त्या कामांची पूर्तता येत्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही.'' 

आमदार मिसाळ म्हणाल्या, "महिलांनी महिलांचा सन्मान ठेवला तर पुरूष देखील महिलांना सन्मानाची वागणूक देतील. विधवा महिलांना समाजात पुरुषांपेक्षा महिलाच जास्त जाच करतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेऊन प्रबोधन करावे.'' अनेक महिलांनी फेटे बांधून यावेळी परिसरातून दुचाकीवरून रॅली काढली. शैलेंद्र बेल्हेकर यांनी सूत्रसंचलन केले. तर शिवराज घुले यांनी प्रास्तविक केले. 

Web Title: Marathi news pune news award different field ladies