विसरलेली बॅग रिक्षाचालकाकडून परत ; प्रामाणिकपणाबद्दल कौतुक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

प्रवाशाचा शोध घेऊन रिक्षात विसरलेली बॅग त्याला परत करण्याचे काम एका रिक्षाचालकाने केले. या प्रामाणिकेबद्दल प्रवाशाने कृतज्ञता व्यक्त केली. 

पुणे : प्रवाशाचा शोध घेऊन रिक्षात विसरलेली बॅग त्याला परत करण्याचे काम एका रिक्षाचालकाने केले. या प्रामाणिकेबद्दल प्रवाशाने कृतज्ञता व्यक्त केली. 

पूनम तितालिया व त्यांच्या सासू या दोघी शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजाराम पुलाजवळून महेंद्र बनसोडे यांच्या रिक्षामध्ये बसून कल्याण भेळ येथे उतरल्या. तितालिया यांचे पती प्रशांत यांच्या मित्राची बॅग त्यांच्याजवळ होती. रिक्षातून उतरताना बॅग रिक्षातच विसरल्या. बॅगेत जागेसंदर्भातील दस्तऐवज, किंडल, चार्जर आदी वस्तू होत्या. त्यामुळे तितालिया यांनी तत्काळ अभिरुची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान, रिक्षाचालकाने या बॅगेत असलेल्या कार्डद्वारे संपर्क साधून तितालिया यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. 

अखेर मोठ्या प्रयत्नाने रिक्षाचालकाचा तितालिया यांच्याशी संपर्क झाला. तितालिया यांनी बनसोडे यांच्या घरी जाऊन बॅग घेतली; तसेच प्रामाणिकतेबद्दल बनसोडे यांचे कौतुक केले. मूळचे सोलापूरचे असलेले बनसोडे हे धायरीतील गणेशनगर भागात राहतात. भाड्याने रिक्षा घेऊन ते व्यवसाय करत आहेत. 

Web Title: Marathi News Pune News Bag Returned by Rikshaw Driver