करवसुलीसाठी भोर तालुका पंचायत समितीतर्फे 'करवसूली अभियान'

महेंद्र शिंदे
सोमवार, 12 मार्च 2018

खेड-शिवापूर (पुणे) : ग्रामपंचायत करवसुलीसाठी भोर तालुका पंचायत समितीतर्फे तालुक्यात प्रथमच 'करवसूली अभियान' राबविण्यात येत आहे. वेळु, शिंदेवाड़ी, ससेवाडी, रांजे आणि कुसगाव या गावात  सोमवारी या अभियानाला सुरुवात झाली. भोरचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्यासह पंचायत समितीचे अनेक अधिकारी स्वतः या वसूली अभियानात सहभागी झाले होते.

तालुक्यातील ग्रामपंचायतीची शंभर टक्के करवसुली व्हावी, या उद्देशाने पंचायत समितीतर्फे हे वसूली अभियान राबविण्यात येत आहे. सोमवारी या वसूली अभियानाला शिंदेवाड़ी, ससेवाडी, वेळु, रांजे आणि कुसगाव या गावातून प्रारंभ करण्यात आला.

भोरचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांची चार पथके बनविण्यात आली आहेत. ही पथके गावागावात जाऊन गावातील कंपन्या, उद्योग, ग्रामस्थ यांच्याकडून करवसूली करतात. 

याबाबत भोरचे गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, "गावगाडा सुरळीत चालवायचा असल्यास ग्रामपंचायतीची करवसुली शंभर टक्के होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे वसूली अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळत असल्याने या अभियानातून नागरीक कर भरण्यासाठी पुढे येत आहेत. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीची शंभर टक्के करवसुली झाली आहे. उर्वरीत 147 ग्रामपंचायतीत हे अभियान आजपासून राबविण्यात येत आहे."

Web Title: Marathi news pune news bhor taluka karvasuli abhiyan