वालचंदनगर : पुलावरील राडारोडा हटविण्याची मागणी

राजकुमार थोरात
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता. इंदापूर) जवळील ओढ्याच्या पुलावरील राडारोडामुळे अपघात होण्याची शक्यता असून राडारोडा त्वरित हटविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता. इंदापूर) जवळील ओढ्याच्या पुलावरील राडारोडामुळे अपघात होण्याची शक्यता असून राडारोडा त्वरित हटविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

निरवांगी जवळील ओढ्यावरील पुल खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. दुरुस्तीच्या कामानंतर पुलावरती दुरुस्तीसाठी आणलेली दगडाची खच, मरुम, वाळू पुलावरती पडून आहे. बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामासाठी आगोदरच दिरंगाई केल्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पुलाचे काम पूर्ण होऊन ही गेल्या अनेक दिवसापासून राडारोडा न हटविल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून राडारोडा त्वरित हटविण्याची मागणी  निरवांगीचे सरपंच दशरथ पोळ यांच्यासह स्थानिक नागरिकामधून होत आहे.

Web Title: Marathi news pune news bridge raw material demand remove