पुणे - चाचणी घेताना बसने घेतला पेट 

संदीप घिसे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून पीएमपीएमएलच्या बसची चाचणी घेत असताना अचानक पेट घेतला. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (ता. ९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.  

पुणे : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून पीएमपीएमएलच्या बसची चाचणी घेत असताना अचानक पेट घेतला. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (ता. ९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.  

अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजताच्या सुमारास मोशी येथे बसला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या बंबाने त्वरीत आग विझविली. पीएमपीएमएलच्या एमएच १४-सीडब्ल्यू-२००८ या बसची चाचणी आरटीओ कार्यालयाकडून दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुरू होती. उन्हामुळे इंजिन गरम होऊन शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी बसचा इंजिनकडील भाग जळून खाक झाला.

Web Title: Marathi news pune news bus fire testing